आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भररस्त्यात वाहनचालकांना अडविणाऱ्या पोलिसांविरोधात तक्रार आल्यास कारवाई

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 2, 2021
Spread the love

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता – लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे–सोलापूर महामार्गावर वाहतूक पोलिसांनी रस्त्याच्या मध्यभागी जाऊन वाहनांवर कारवाई केली आणि वाहनचालकाने तक्रार दिली, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लोणी काळभोर येथे दिला आहे.


लोणी काळभोर (ता. हवेली) येथील लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते बुधवारी (दि. १) करण्यात आले. याप्रसंगी पोलीस सहआयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ-५ च्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, भारत पेट्रोलियम कार्पोरेशनचे मुख्य प्रबंधक राहुल सूर्यवंशी, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे. पोलिस निरीक्षक सुनील जैतापुरकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर, श्रीशैल चिवडशेट्टी, पोलिस उपनिरीक्षक, जयंत हंचाटे, अमृता काटे, दिगंबर बिडवे, प्रमोद हंबीर उपस्थित होते.


पुणे – सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौक मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वाहतूक शाखेचे पोलीस महामार्गावर भर रस्त्याच्या मधोमध उभे राहून सर्रास पावत्या देऊन दुचाकी, चारचाकींसह अवजड वाहनचालकांची अडवणूक करत आहेत. त्यामुळे चालकांसाठी डोकेदुखी वाढली आहे. याबाबत पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, “वाहतूक पोलिसांना अशा कोणत्याही सूचना किंवा टार्गेट देण्यात आलेले नाहीत. वाहतूक पोलीस कारवाईत हयगई करणार नाहीत, तसेच रस्ता, वाहतूक सुरक्षिततेलाच वाहतूक पोलिसांनी महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

get_footer();