आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव टँकरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 7, 2022
Spread the love

चांदणी चौकात झाला अपघात : वारजे पोलिसांनी टँकरचालकाला केली अटक

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव टँकरच्या धडकेत मोपेडवरील ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. वारजेमाळवाडी चांदणी चौक येथे 5 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वा. हा अपघात झाला. पोलिसांनी टँकरचालकाला अटक केली आहे.

चंद्रकांत भालचंद्र पेटवे (वय 75, रा. वेलवर्थ टिन्स लटाऊन, बावधन, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी अमोल पेटवे (वय 42, रा. बावधन, पुणे) यांनी वारेज पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी ज्ञानेश्वर मारुती टोकळवाड (वय 21, रा. नांदेड, पुणे) या टँकरचालकाला अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे वडिल मोपेडवरून चांदणी चौकातून वारजे माळवाडी येथे जात होते. त्यावेळी भरधाव पाण्याच्या टँकरची धडक बसून अपघात झाला. या अपघातामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला होता. पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास वारजे माळवाडी पोलीस करीत आहेत.

get_footer();