आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भरधाव टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 6, 2022
Spread the love

टेम्पोचालक अटकेत : सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव टेम्पोच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याने टेम्पोचालकाला अटक केली. तीन हत्ती चौकातील अहिल्यादेवी रस्त्यावर ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी सव्वा आठ ते साडेआठच्या सुमारास अपघात झाला.

चिंकाबाई रघुनाथ काटे (वय ८५, रा. संभाजीनगर, धनकवडी, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या आजीचे नाव आहे.
सुनील कंडू बैकर (वय ४१, रा. नालासोपारा फाटा, बरफनगर, पैलारगाव, ता. वसई, जि. पालघर असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी सागर कांटे (वय २७, रा. धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या आजी तीन हत्ती चौकाकडून अहिल्यादेवी रस्त्याने पायी जात होत्या. त्यावेळी आरोपीच्या भरधाव टेम्पोची आजींना धडक बसून अपघात झाला. या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. सहकारनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. जगताप पुढील तपास करीत आहेत.

get_footer();