आवृत्ती पुणे
← Back to Homepage

भररस्त्यात महिलेकडे शरीर सुखाची मागणी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 28, 2021
Spread the love

वानवडी पोलिसांत गुन्हा : वानवडीतील केपीसीटी मॉलसमोर घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अलीकडे पुण्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच वानवडी परिसरात रस्त्याने पायी जाणाऱ्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार वानवडी येथील केपीसीटी मॉलच्यासमोर सोमवारी (दि.27) दुपारी तीनच्या सुमारास घडला.

चंद्रकांत सोनी (वय-30 रा. आनंदनगर, बिबवेवाडी, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर परिसरात राहणाऱ्या एका 28 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी सोनी हा चालक असून, सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास पीडित महिला काम संपवून पायी जात होती. त्यावेळी आरोपी सोनी याने महिलेला तुम्हाला घरी सोडतो असे म्हणत अश्लील शब्द वापरले. तसेच महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
पीडित महिलेने पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर आरोपी विरोधात 354 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भुषण पोटवडे करीत आहेत.

get_footer();