आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बिअरची बाटली फोडून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

फरासखाना पोलिसांत फिर्याद : मंगळवार पेठेत बुधवारी रात्री घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भांडणाचा राग मनात धरुन सराईत गुन्हेगाराने त्याच्या साथिदारांच्या मदतीने एका तरुणाला बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवार पेठेत बुधवारी (दि.30 मार्च) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे. पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

निलेश विष्णु कांबळे (वय २६, रा. 216 मंगळवार पेठ, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी ओंकार मासाळ उर्फ हर्षद शेख (रा. मंगळवार पेठ), बाबू उर्फ मोहसिन शेख, भैय्या शिंदे (रा. कसबा पेठ), व्हल्या आणि इतर दोन ते तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ओंकार मासाळ हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी आणि फिर्यादी यांचे 29 मार्च रोजी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी फिर्यादी हा त्याच्या मित्राच्या खोलीत झोपलेला असताना रात्री झालेल्या भांडणावरुन फिर्यादीला मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. आरोपींनी लाकडी दांडके, लोखंडी कोयते घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभंग करीत आहेत.

get_footer();