आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बिबवेवाडीत कोयत्याने सपासप वार करून तरूणाचा खून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा केला प्रयत्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पूर्ववैमनस्यातून चौघांनी २१ वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ शुक्रवारी (दि. १८) धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरूणाला खल्लास केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून शिवीगाळ करत जर कोणी काही बोललात तर याद राखा असे जोरजोरात ओरडून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली.

योगेश रामचंद्र पवार (वय २१, रा. सुवर्णयुग मित्र मंडळ जवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी योगेशचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (वय २२, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनि भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, योगेश पवार, वैभव घाटूळ आणि गणराज ठाकर हे फिर्यादीच्या मोटारसायकलवरून योगेशच्या घरी जात होते. ते सुपर इंदिरानगर येथे आले असता आरोपींनी पुर्वी झालेल्या भांडणावरून योगेशच्या दिशेने रंग फेकला. योगेशने गाडी थांबवून त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. दरम्यान, काही क्षणातच योगेश रक्ताच्या थारोळयात जमिनीवर पडला. त्याला तात्काळ ससून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलाडे, वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे, सहायक निरीक्षक प्रविण काळुखे, सहायक पोलीस निरीक्षक किरण देशमुख, उपनिरीक्षक यश बोराटे, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण काळे, संजय अदलिंग यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजकुमार बरडे करीत आहेत. आरोपी फरार झाले असून, बिबवेवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत आहेत.

get_footer();