आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बोल्हाई मंदिरातील दागिनेचोर जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 27, 2021
Spread the love

समर्थ पोलीस ठाण्यातील पोलिसांची कामगिरी : सीसीटीव्ही फूटेजच्या आधारे घेतला शोध

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुण्यातील जुन्या जिल्हा परिषदेजवळील बोल्हाई माता मंदिरातील देवीचा चांदीचा मुकुट व दागिन्यांची १२ ऑगस्ट रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास चोरी झाली होती. समर्थ पोलीस ठाण्यातील तपासपथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत संशयित आरोपीला ताब्यात घेऊन जेरबंद केले आहे.

अनिल हौशीलाल चव्हाण (वय ३१, रा. वडजाई, ता. हवेली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या ताब्यातून देवीचे दागिने व चांदीचा मुकुट हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणाचे आधारे चोरी झाली तेव्हापासून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला, मात्र तो मिळून येत नव्हता.


दरम्यान, पोलिसांनी शहरातील इतरत्रचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून पुणे स्टेशन व आसपासच्या भागात आरोपी फिरल्याचे दिसून आले. त्यावरून तपास पथकाने सर्व सीसीटीव्ही फुटेज, खबरे व इतर सर्व प्रकारे रात्रदिवस तपास करून आरोपीचा शहर परिसरात शोध घेतला. फुटेजमधील आरोपीची ओळख पटविण्यासाठी आसपासच्या नागरिकांना फुटेज दाखवून आरोपीची ओळख पटवून तपासाची दिशा ठरविली. त्यावेळी मंगळवार पेठ, बारणे रोड येथे सीसीटीव्हीत आरोपी दिसून आला. त्यामुळे पोलीसांनी धाव घेत त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता आरीकडेचे दागिने मिळून आले. आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे करीत आहेत.


ही कामगिरी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे व पोलीस निरीक्षक (गुन्हे) उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश भालेराव, पोलीस अंमलदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, महेश जाधव, नीलेश साबळे, हेमंत पेरणे, सुभाष मोरे यांच्या पथकाने केली.

get_footer();