आवृत्ती पुणे
← Back to Homepage

उधार कपडे न दिल्याने दुकानदाराला लाकडी दांडक्याने मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021
Spread the love

औंधमधील परिहार चौकातील घटना ; परिसरात घबराटीचे वातावरण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

उधार कपडे न दिल्याने दुकानदारास लाकडी दांडक्याने माहराण करीत शिवीगाळ करून भीतीचे वातावरण निर्माण केले.
औंधमधील परिहार चौकामधील रिबॉन शॉपमध्ये ही घटना घडली.

मिथून जुन्नरकर (वय ३२, रा. पिंपळे-निलख, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीसह दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या दुकानामध्ये तिघे अनोळखीसह त्यांचे साथीदार आले. त्यांनी उधार कपडे मागितली. मात्र, उधार कपडे देण्यास नकार दिल्याने चिडून जाऊन फिर्यादीस आरोपींनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केली. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढील तपास चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव करीत आहेत.

get_footer();