आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन सराईत मोबाईल चोरट्यांना केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 14, 2022
Spread the love

स्वारगेट पोलिसांची कारवाई : २५ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दोन मोबाईल चोरट्यांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून २५ हजार ३०० रुपयांचा मोबाईल हस्तगत केला.

सचिन दत्तात्रय जाधव (वय ४५), मन्नु मारुती जाधव (वय ४५, दोघे रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये सुनील लालू भंडारी (वय ३०, रा. गोपाळपट्टी, मांजरी बु, हडपसर) यांनी मोबाईल चोरी झाल्याची फिर्याद दिली होती. त्याचा तपास सुरू असताना आरोपींविषयी विश्वसनीय सुत्रांकडून माहिती पोलिसांना मिळाली, त्यानुसार अटक करून २५ हजार ३०० रुपयांचा मोबाईल जप्त केला.

अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सुषमा चव्हाण, स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ए. के. रसाळ, येवले, कांबळे, साळवे, वाबळे, शेख, खेंदाड, बडे, भोकरे, ढावरे, दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();