आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पुणे स्टेशन परिसरातून गांजा विक्रेत्या दोघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Previous Issue • May 20, 2023
Spread the love

साडेबारा लाखापेक्षा अधिक किंमतीचा गांजा जप्त

पुणे : बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीत पुणे रेल्वे स्टेशनच्या पार्सल गेटसमोर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. मंतू राय, वय वर्षे 30, राकेशकुमार दास वय 19 वर्षे दोघेही राहाणार मूळ बिहार अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आरोपींकडून 63 किलो 694 ग्रॅम वजनाचा 12 लाख 73 हजार 880 रूपये किंमतीचा गांजा जप्त केला असून, 23 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल फोन आणि तीन बॅग असा एकूण 12 लाख 96 हजार 980 रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला. आरोपींविरूद्ध बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, गुन्हे शाखेचे पोलिस उप आयुक्त अमोल झेंडे, गुन्हे २ चे सहाय्यक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील थोपटे, सहायक उपनिरीक्षक घुले, पोलीस अमलदार योगेश मांढरे, संतोष देशपांडे, प्रशांत बोमदांडी, संदीप जाधव, महेश साळुंखे, साहिल सय्यद शेख, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बस्तेवाड यांनी केली.

get_footer();