आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन वर्षांपासून फरार आरोपीला ठोकल्या बेड्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : ओळख लपवून गावातून झाला होता पसार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मागिल दोन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या आरोपीला लोणीकाळभोर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपी ४ ऑगस्ट २०२० पासून स्वतःची ओळख लपवून गावातून फरार झाला होता. तांत्रिक तपास करीत सापळा रचून आरोपीला पोलिसांनी अटक केली.

चेतन ऊर्फ मयूर रामदास शेलार (वय २२, रा. पेठ नायगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपीची तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला सापळा रचून ताब्यात घेत अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे पुढील तपास करीत आहेत.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार सोनवणे, विजय जाधव, दिगंबर जगताप, महेश भोंगळे, विशाल बनकर यांच्या पथकाने ही दमदार कारवाई केली.

get_footer();