आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ब्रेकअपनंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन केला भलताच ‘प्रकार’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 6, 2021
Spread the love

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये तरुणाविरुद्ध गुन्हा : फुरसुंगीमधील धक्कादायक घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीच्या घरी जाऊन राडा घालत धमकी दिल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.2) रात्री अकराच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. याप्रकरणी तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तरुणीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अक्षय राजेंद्र कांचन (वय-24 रा. उरुळी कांचन बाजारपेठ जवळ, ता. हवेली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी फुरसुंगी येथे राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांचे ओळखीचे असून त्यांच्यामध्ये प्रेम संबंध होते. मात्र, त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाले आहे. ब्रेकअप झाले असताना आरोपीने फिर्यादी यांचा पाठलाग करुन आणि फोन करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच लग्नाची मागणी करुन लग्न केले नाहीतर बघून घेण्याची धमकी दिली.

फिर्यादी तरुणीने त्याला कोणताही प्रतिसाद न देता समज दिली. तसेच त्याच्या घरच्यांना आणि मैत्रिणीला याबाबत सांगितले. याचा राग आल्याने तरुणाने फिर्यादी यांच्या घरी जाऊन वडिलांकडे लग्नाची मागणी करुन धमकी दिली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

get_footer();