आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बिल्डर सूर्यकांत काकडे, कृष्णा गुरूजी यांच्यासह 9 जणांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 10, 2022
Spread the love

कोथरूड पोलिसांत फिर्याद : मंत्र-तंत्र, लिंबू ठेवून वश करण्याचा प्रयत्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मुलगा व्हावा यासाठी सूनेचा छळ करुन तिच्या बेडखाली मंत्र-तंत्र करुन आणलेले व तिचे नाव लिहिले लिंबु ठेवून त्यांना वश करण्याचा प्रयत्न करणे, मंत्रून दिलेल्या पावडरचे अस्वच्छ, बेचव व काळे पाणी पिण्यास भाग पाडणे, तसेच पहिले लग्न झाले असतानाही ते लपवून ठेवून मुलाचे पुन्हा लग्न लावण्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक सूर्यकांत काकडे यांच्यासह 9 जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मे 2021 ते 24 डिसेंबर 2021 दरम्यान सर्वत्र सोसायटीत घडला आहे.

सूर्यकांत दत्तात्रय काकडे, कविता सूर्यकांत काकडे, जय सूर्यकांत काकडे, विजय सूर्यकांत काकडे, अजय सूर्यकांत काकडे (सर्व रा. सर्वत्र सोसायटी, कृष्णा हॉस्पिटलजवळ, कोथरुड), अश्विनी पुजारी, सुशांत पवार आणि कृष्णा गुरुजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कोंढव्यात राहणार्‍या 24 वर्षाच्या महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, सूर्यकांत काकडे हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. त्यांचा मुलगा जय काकडे याचे पुर्वी लग्न झाले असताना ते फिर्यादी व त्यांचे नातेवाईकांपासून लपवून ठेवले.

आरोपींनी फिर्यादीचा शारीरीक व मानसिक छळ करुन फिर्यादीचे स्त्रीधन बळजबरीने काढून घेऊन त्यांचा विश्वासघात केला.
सूर्यकांत काकडे याने फिर्यादीचे कमरेमध्ये हात घालून मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन करुन फिर्यादीला अश्लिल व घाणेरड्या शिवीगाळ करुन बेदम मारहाण केली. लग्न झाल्यानंतर मुलगा व्हावा, म्हणून फिर्यादी व तिचे बहिणीला कृष्णा गुरुजी याने मंत्रून दिलेल्या पावडरचे अस्वच्छ, बेचव व काळे पाणी पिण्यास भाग पडले.

फिर्यादीचे बेडखाली मंत्र -तंत्र करुन आणलेले व फिर्यादीचे नाव लिहिलेले लिंबु ठेवून त्यांना वश करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी या बाहेर जात असताना त्यांच्या पर्समध्ये कसली तरी पुडी ठेवून जादुटोणा करुन फिर्यादी व फिर्यादीची बहिण यांचे संमतीशिवाय नकळत अश्लिल व्हिडिओ शुटींग केले. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची फिर्यादीचे वडिलांना त्याचे बोर्ड लावेल, अशी धमकी देऊन आमची कोठेही तक्रार करायची नाही, आमचे संबंध छोटा राजनशी आहेत, राजकीय संबंध वरपर्यंत आहेत. आमच्या नादी लागू नका.
नादी लागला तर कोठे गाडून टाकेन, ते कोणाला शोधून देखील सापडायचे नाही,
अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
वेगवेगळी पत्रे पाठवून त्यामध्ये फिर्यादी व तिच्या बहिणीवर खोटे व चुकीचे आरोप करुन त्यांची बदनामी केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.

कोथरुड पोलिसांनी गुरनं 60/2022 प्रमाणे IPC 498 (A), 494, 406, 420, 324, 342, 509, 323, 504, 506 (2), 500, 34 सह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालणेबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम क्र. 3 (2), 3 (3) सह आय.टी. अ‍ॅक्ट कलम 66 (ई) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कोथरूड पोलिस वर नमुद केलेल्यांवर आणखी एक गुन्हा दाखल झालेला आहे. पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या फिर्यादीनुसार विजय सुर्यकांत काकडेचे पुर्वी लग्न झालेले आहे. हे फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांपासून लपवुन ठेवण्यात आले. वरील गुन्ह्याप्रमाणेच (गुरनं 60/2022) यादेखील गुन्ह्यामध्ये सर्वांनी फिर्यादीशी वर नमुद वर्णनाप्रमाणे शारिरीक व मानसिक छळ केला आहे. कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या 2 वेगवेगळया फिर्यादीमध्ये नमुद करण्यात आलेली आहे.

get_footer();