आवृत्ती पुणे
← Back to Homepage

व्यापाऱ्याकडून खंडणी घेताना जंगल्या सातपुतेसह तीघे ‘जेरबंद’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 8, 2021
Spread the love

खंडणी विरोधी पथकाची कारवाई : विमाननगरमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये लावला होता सापळा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे शहरात टोळीचा जम बसविण्यासाठी टिंबर मार्केटमधील व्यापाऱ्याकडून एक लाख रुपयाची खंडणी घेताना जंगल्या सातपुतेसह टोळीतील तिघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. यासाठी विमाननगर येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला होता.

विशाल ऊर्फ जंगल्या शाम सातपुते (वय 32 , रा. पीएमसी कॉलनी, घोरपडे पेठ), मंगेश शाम सातपुते (वय 36) आणि अक्षय दत्तात्रय भालेराव (वय 26, रा. भेकराईनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी येथील एका 46 वर्षाच्या व्यापाऱ्याने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, विशाल ऊर्फ जंगल्या श्‍याम सातपुते याच्यावर खुन, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी असे विविध 4 गुन्हे दाखल आहेत. तो सध्या जामिनावर बाहेर आला आहे. विशाल सातपुते व त्याच्या टोळीतील 6 जण अशा 7 जणांना पुणे पोलिसांनी ऑगस्ट 2020 मध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पकडले होते. त्यांच्याकडून पिस्तुल, काडतुसे आणि कोयते असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता.

जंगल्या सातपुते हा जामिनावर सुटल्यावर मागील काही दिवसांपासून फिर्यादी यांना सतत फोन करत होता. त्यांना ‘मी पुण्यातील भाई असून माझी पुण्यामध्ये टोळी आहे’, मला माझ्या टोळीचा पुणे शहरात जम बसवायचा आहे, तुला टिंबर मार्केटमध्ये धंदा करावयाचा असेल तर मला 2 लाख रुपये दे. जर पैसे दिले नाही तर तुला संपवून टाकेन, अशी धमकी देऊन खंडणीची मागणी करीत होता.

या व्यापाऱ्याने खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यानंतर पैसे घेण्यासाठी या गुंडांना विमाननगर येथील हॉटेल हयात रिजेन्सी येथे बुधवारी सायंकाळी बोलविण्यात आले होते. तेथे पोलिसांनी सापळा रचला होता. फिर्यादीकडू या गुडांनी 1 लाख रुपये खंडी स्वीकारली असताना पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

get_footer();