आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बुटामधून सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 12, 2022
Spread the love

सीमा शुल्क विभागाची कारवाई : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे सोन्याच्या तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या एका प्रवाशाला सोने तस्करीच्या आरोपात पकडण्यात आले आहे. दुबईहून पुण्यात आलेल्या प्रवाशाने तब्बल 34 लाख 81 हजारांच्या सोन्याच्या बिस्कीटांची तस्करी आपल्या पायातील बुटामधून केल्याचा प्रकार सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) गुप्तचर यंत्रणांनी उघडकीस आणला आहे.

या कारवाईत संबंधित प्रवाशाकडून 705 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. सीमा शुल्क विभागातील अधिकाऱ्यांनी प्रवाशाकडे केलेल्या तपासामध्ये तो दुबई ते अहमदाबाद आणि त्याच विमानाने पुण्यातील लोहगाव विमानतळ येथे आला होता. प्रवाशांची तपासणी करण्यात येत असताना हा प्रकार उघडकीस आला. चिकटपट्टीने बिस्कीटे गुंडाळून त्याने ती बुटात ठेवून आणल्याचे कस्टम विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी प्रवाशाला अटक करण्यात आली असून हा प्रकार सोमवार (दि.7) समोर आला आहे.

पुणे कस्टम विभागाकडून तस्करीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. डिसेंबर 2021 मध्ये केलेल्या कारवाईत चेन्नई ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडून 24 कॅरेटचे 40 लाख 36 हजार रुपयांचे 800 ग्रॅम सोने जप्त केले होते. तर 8 फेब्रुवारी 2022 रोजी केलेल्या कारवाईमध्ये पुणे विमानतळावरुन शारजाह येथे जाणाऱ्या एका प्रवाशाकडून 6 लाखांचे विदेशी चलन जप्त केले.

get_footer();