आवृत्ती पुणे

जिनेश नानल यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार

इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंगमध्ये जागतिक स्तरावर ठसा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्याच्या जिनेश नानल यांनी आपल्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीने महाराष्ट्राच्या क्रीडा इतिहासात सुवर्णाक्षरांनी आपले नाव कोरले आहे. इनलाइन फ्रीस्टाईल स्केटिंग या क्रीडा प्रकारात त्यांनी सातत्यपूर्ण सराव व मेहनतीच्या जोरावर अभूतपूर्व यश संपादन केले असून, त्यांच्या या यशस्वी वाटचालीची दखल घेत त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार २०२३-२४ … Read more

साळुंखे विहारमध्ये एअरगनच्या फायरिंगने उडाली खळबळ

कोंढवा पोलिसांनी एअरगनसह एकाला घेतले ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : साळुंखे विहार येथील एका घरावर गोळीबार झाल्याने घराच्या खिडक्यांच्या काचांवर छिद्रे पडल्याचे दिसून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, समोरील इमारतीमधून एअरगनने फायरिंग केल्याचे उघडकीस आले. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून पोलिसांनी एकाला एअरगनसह ताब्यात घेतले आहे. … Read more

पुमा से कंपनीच्या नावाने बनावट चप्पल, बुटांची विक्री

पिंपरीतील दुकानावर छापा टाकून पोलिसांनी केला ७ लाख ५९ हजारांचे बनावट माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पिंपरी : पुमा से या कंपनीच्या बनावट ब्रँडच्या नावाने बनावट चप्पल व बुटांची विक्री करणाऱ्या पिंपरीतील दुकानावर पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी दुकानदारावर कॉपीराइट कायद्याखाली गुन्हा दाखल करून ७ लाख ५९ हजार रुपयांचे बनावट शूज व चप्पला जप्त केल्या आहेत. … Read more

पदमावतीतील सराईत गुंडावर एमपीडीए कारवाई

पोलीस आयुक्तांनी केली नागपूर कारागृहात स्थानबद्ध महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पदमावती परिसरात दहशत माजवून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. मयूर रंगनाथ आरडे (वय २४, रा. तळजाई वसाहत, पदमावती) असे या गुंडाचे नाव आहे. मयूर आरडे हा सहकारनगर परिसरात … Read more

“उत्तुंग भरारी” सन्मान सोहळ्यात मान्यवरांचा गौरव

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान म्हणजे समाजाला मिळणारी प्रेरणा. जैन सोशल ग्रुप पुणे पश्चिम यांच्या वतीने आयोजित “उत्तुंग भरारी सन्मान सोहळा” नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात आनंद भंडारी (जमाबंदी आयुक्त व अतिरिक्त संचालक भुमी), शेखर मुंदडा (अध्यक्ष, महाराष्ट्र … Read more

पेट्रोल पंपावर दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड

आंबेगाव पोलिसांची कामगिरी : कोयता, मिरची पूड, दोरी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कात्रज येथील लाटमे पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून कोयता, मिरची पूड, दोरी असा एकूण ४० हजार रुपयांचे दरोड्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. चोरट्यांपैकी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. सौरभ गोरक्ष चौधरी … Read more

कुस्तीच्या आखाड्यात हाणामारी

किरकोळ वादातून भांडण : लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गुढीपाडव्यानंतर गावोगावी जत्रा सुरू होत असतात. सध्या यात्रा, जत्रांचा हंगाम सुरू आहे. त्यात कुस्तीच्या आखाड्याचे आयोजन करण्यात येते. हवेली तालुक्यातील बुर्के गावात आखाड्यात बसण्याच्या वादातून चौघांना काठी, दगडाने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल … Read more

खरीप हंगामपूर्व तयारीसाठी धाराशिव येथे कृषी विभागाची समन्वय बैठक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क धाराशिव : अनिल डुंगरवाल – खरीप हंगाम 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कृषी विभागामार्फत खरीप हंगाम पूर्वतयारीबाबत एक महत्त्वपूर्ण आढावा व मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस विविध स्तरांवरील कृषी अधिकारी, कर्मचारी, व कृषी सेवा केंद्र चालक उपस्थित होते. आज दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी खरीप हंगाम पूर्वतयारी अनुषंगाने कृषी … Read more