आवृत्ती पुणे

सिक्युरिटी गार्डचे हात बांधून ७ लाखांची रोकड चोरी

वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये धाडसी घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वाकडेवाडी येथील ब्राम्हा मोटर्स रॉयल एनफिल्ड शोरुममध्ये सिक्युरिटी गार्डला कटरचा धाक दाखवून, त्याचे दोन्ही हात नायलॉनच्या पट्टीने बांधून, तब्बल ७ लाख ११ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धाडसी घटना उघडकीस आली आहे. ही घटना १९ ऑगस्ट रोजी पहाटे पावणे तीन वाजता … Read more

ताम्हिणी घाटात २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पाऊस

मुंबईसह कोकणात अतिवृष्टी : पुण्यात ६० मिमी पावसाची नोंद महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अशी नोंद झालेल्या ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत विक्रमी ५७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी २५ जुलै २०२४ रोजी येथे ५५६ मिमी पाऊस पडला होता. हवामान विभागानुसार, २४ तासांत २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस पडल्यास त्याला … Read more

बनावट सोनसाखळ्या गहाण ठेवून सराफांची फसवणूक करणारी टोळी जेरबंद

बनावट पावत्या व आधार कार्ड वापरून घालत होते गंडा : युनिट ६ ची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : होलमार्कची चिन्हे असलेली बनावट सोनसाखळी व ब्रेसलेट हे खरे असल्याचे भासवून सराफांकडे गहाण ठेवून पैसे उकळणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले आहे. राहुल संजय गोरे (वय ३०, रा. ओम अपार्टमेंट, मोहननगर, … Read more

अतिवृष्टीग्रस्त परांडा मतदारसंघातील सर्व महसूल मंडळांचा समावेश करावा

प्रशासनाकडे मा. आ. राहुल मोटे यांची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : परांडा विधानसभा मतदारसंघात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे, जनावरांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातील तिन्ही तालुक्यांतील (भूम, वाशी व परांडा) सर्व महसूल मंडळांचा अतिवृष्टीग्रस्त भागामध्ये समावेश करावा, अशी ठाम मागणी मा. आ. राहुल मोटे यांनी प्रशासनाकडे केली आहे. मागील … Read more

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज दुमजली उड्डाणपुलाचे होणार लोकार्पण महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी (दि.२०) सायंकाळी करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली असून बुधवारी लोकार्पण झाल्यानंतर रहदारीसाठी हा उड्डाणपुल … Read more

पारगाव मंडळात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

शेतकऱ्यांनी तत्काळ पंचनामे करून घ्यावेत : मा. आ. राहुल मोटे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पारगाव : पारगाव (मोटे) येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले असून पिके पाण्याखाली गेली आहेत. आज महसूल अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या पिकांचे स्पॉट पंचनामे करण्यात आले. ज्यांनी अद्याप पंचनामे केलेले नाहीत त्यांनी तातडीने करून … Read more

तेरखेडा मंडळात अतिवृष्टीमुळे पंचनामे सुरू

शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी : शेतकरी नुकसानभरपाईसाठी आग्रही महाराष्ट्र न्यूज नेटवर्क तेरखेडा : तेरखेडा मंडळातील कडकनाथ वाडी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले असून त्याबाबत पंचनामे सुरू झाले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून पंचनामे करण्यात येत आहेत. या कामासाठी कृषी सहाय्यक अमोल मुळे, तलाठी सुप्रिया भोसले तसेच ग्रामसेवक महादेव सुद्रिक यांनी … Read more

पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार

बिबवेवाडीतील घटनेत दोघेजण गंभीर जखमी; खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून टोळक्याने तरुणाच्या डोळ्यात स्प्रे मारून त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचविण्यास आलेल्या मित्रावरही मारहाण करून त्याच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तरुणासह त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. याबाबत अभय रमेश साठे (वय २३, रा. … Read more

रेल्वे प्रवासी महिलेकडील दागिने चोरणारा चोरटा दिल्लीतून जेरबंद

पुणे व मिरज स्थानकातील चोरीचे गुन्हे उघड : पुणे लोहमार्ग पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेल्वे स्टेशनवर उतरण्याच्या वेळी मदत करण्याचा बहाणा करून महिला प्रवाशांच्या बॅगेतील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला पुणे लोहमार्ग पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. या चोरट्याने पुणे व मिरज रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांकडील ऐवज लांबवल्याचे दोन गुन्हे उघड झाले असून, त्याच्याकडून एकूण … Read more