आवृत्ती पुणे

दहशत माजविण्यासाठी गुलटेकडीत गोळीबार

स्वारगेट पोलिसांनी चार अल्पवयीन गुन्हेगारांकडून २ पिस्तुले, ३ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सराईत अल्पवयीन गुन्हेगारांनी खंडणी उकळण्यासाठी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबार केल्याची घटना गुलटेकडी येथे शुक्रवारी रात्री घडली. स्वारगेट पोलिसांनी तातडीने कारवाई करत चारही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २ पिस्तुले व ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याबाबत … Read more

बुलेट चालकाने ज्येष्ठ नागरिकास केली मारहाण

बुलेटचा हॉर्न वाजवू नको, लोक झोपले आहेत, असे म्हटल्याने झाला वाद : महर्षीनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सोसायटीच्या आवारात बुलेटचा कर्णकर्कश हॉर्न वाजवल्याबाबत विचारणा केल्याने ज्येष्ठ नागरिकाला बॅट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना महर्षीनगर भागात घडली. या प्रकरणी बुलेट चालकासह त्याच्या ७ ते ८ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत … Read more

गुंतवणूकदारांची फसवणूक करून ३ वर्षे फरार असलेला आरोपी जेरबंद

चंदननगर पोलिसांची कामगिरी : ९० गुंतवणूकदारांना ३ कोटी ३९ लाखांचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून ९० गुंतवणूकदारांची ३ कोटी ३९ लाख १२ हजार ६३७ रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या कंपनी संचालकाला पकडण्यात चंदननगर पोलिसांना ३ वर्षांनंतर यश आले. भारत सोपान पठारे (वय ३०, रा. नाऊरगाव, … Read more

सोने मुल्यांकनकरने संगनमत करुन बँकेला घातला कोट्यावधीचा गंडा

बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचे सांगून ४१ जणांना सोने तारण कर्ज देऊन बँकेची फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कल्याण जनता सहकारी बँकेने नेमलेल्या गोल्ड व्हॅल्युअरने संगनमत करून ४४ जणांना सोनेतारण कर्जासाठी बनावट सोन्याचे दागिने खरे असल्याचा अहवाल दिला. बँकेने सोनेतारणावर कर्ज दिल्यानंतर गोल्ड व्हॅल्युअर फरार झाला असून कल्याण जनता सहकारी बँकेला तब्बल १ कोटी … Read more

दोघा वृद्ध नागरिकांची सव्वातीन कोटींची फसवणूक

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा बहाणा करून अटकेची भीती दाखवत सायबर चोरट्यांचा डाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आधार कार्डचा गैरवापर करून बनावट बँक खाते उघडण्यात आले असून त्याद्वारे मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा खोटा आरोप करत अटकेची भीती दाखवून दोन ज्येष्ठ नागरिकांची सुमारे सव्वातीन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. एरंडवणे येथील ७० वर्षीय नागरिकाने सायबर … Read more

भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन व केळी पीक परिसंवाद उत्साहात संपन्न

६०० ते ७०० शेतकऱ्यांचा सहभाग : खवा उद्योग व केळी उत्पादनाला नवी दिशा महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भूम यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘रामहारी मंगल कार्यालय’, भूम येथे जिल्हास्तरीय खवा खरेदीदार–विक्रेता संमेलन तसेच केळी पीक परिसंवाद २०२६ चे आयोजन करण्यात आले. … Read more

बार्शी डाकघरात शिवविचारातून शिवजयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्या वतीने सामूहिक शिवविचारातून बार्शी येथील डाकघरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ठीक ११ वाजता झालेल्या या कार्यक्रमात गरजू व हुशार अशा पाच शिवकन्यांच्या नावाने प्रत्येकी ₹5,000 ची मुदतठेव (एफडी) करून त्यांचे पोस्टाचे पासबुक त्यांच्या पालकांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने … Read more

बनावट कागदपत्रे दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हा दाखल

शासकीय ठेकेदार विठ्ठल पोळेकर खून प्रकरणातील टोळीप्रमुखाचा भाऊ महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डोणजे येथे राहत असताना आणि नावावर गुन्हे दाखल असतानाही लोणी काळभोर येथील पत्ता दाखवून शस्त्र परवाना मिळविणाऱ्या गुन्हेगारावर बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, रा. डोणजे, ता. हवेली) असे या … Read more