आवृत्ती पुणे

लाकडी बॅटने मारहाण करून तरुणाचा केला खून

धायरीतील घटना : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारल्याचे कारण, संशयित आरोपी फरार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रेमसंबंधाबाबत जाब विचारून पुन्हा अल्पवयीन मुलीला त्रास देऊ नको, असे सांगितल्याच्या कारणावरून तरुणाला लाकडी बॅटने मारहाण करून त्याचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयित आरोपी फरार झाला आहे. विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. राधिका रॉयल सोसायटी, बारंगणीमळा, धायरी) … Read more

१८ वर्षांच्या युवकाने राज्य शिक्षण बोर्डासह अनेकांना फसवले

टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन पेपर फोडल्याचे भासवले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : टेलिग्राम चॅनेलवरील ‘रिप्लेस’ या फिचरचा गैरफायदा घेऊन एका १८ वर्षांच्या युवकाने राज्य माध्यमिक शिक्षण मंडळासह अनेकांना गंडवले. पोलिसांच्या तपासात या युवकाने टेलिग्राम चॅनेलच्या फिचरचा गैरफायदा घेऊन अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या टेलिग्राम चॅनेलवर पेपर फुटल्याचे दिसत असले, … Read more

पुणे वाहतूक पोलिसांच्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारतातील सुशासन, डिजिटल इनोव्हेशन आणि सामाजिक विकास क्षेत्रातील उत्कृष्ट उपक्रमांना ‘स्कॉच’ पुरस्कार दिला जातो. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीत नागरिकांच्या सहभागासाठी सुरू केलेल्या ‘पीटीपी ट्रॅफिक अ‍ॅप’ला ‘स्कॉच’ अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. शासन, पोलीस विभाग, सार्वजनिक संस्था, बँका, उद्योग तसेच सामाजिक क्षेत्रात नागरिकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे मूल्यांकन करून त्यांना … Read more

गावठी पिस्तूल बाळगणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

शिवाजीनगर पोलिसांची कामगिरी : मित्राकडे पार्टीसाठी आला असताना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मित्राकडे पार्टी करण्यासाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगाराला शिवाजीनगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिद्धार्थ अनिल बोराडे (वय २०, रा. ज्ञानेश्वरनगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. … Read more

ज्येष्ठ नागरिकांची पावणे अकरा कोटी फसवणुकीत तिसरा आरोपी जेरबंद

सायबर पोलिसांचे यश : फसवणुकीची रक्कम तब्बल ५ हजार ४३६ बँक खात्यात ट्रॉन्सफर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला तब्बल १० कोटी ७४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील आणखी एका आरोपीला सोलापूरमधून अटक करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. या फसवणुकीतील रक्कम तब्बल ५ हजार ४३६ विविध बँक खात्यांमध्ये फिरविण्यात आल्याचे … Read more

गांजा वाहतूकीसाठी फॉच्युनर गाडीचा वापर करणारा जेरबंद

अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५३ किलो गांजासह ४० लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गांजा वाहतुकीसाठी फॉर्च्युनर गाडीचा वापर केला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून ५३ किलो गांजासह एकूण ४० लाख ७० हजार २८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रीतम रवींद्र कुंजीर … Read more

आरसोली येथील विद्यार्थिनीची राज्यस्तरीय अभ्यासभेटीसाठी निवड

राष्ट्रीय आविष्कार अभियानांतर्गत दोन दिवसीय शासकीय सहलीसाठी संधी महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : भूम तालुक्यातील आरसोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी संस्कृती नितीन गुंजाळ हिची राज्य शासनाच्या समग्र शिक्षा २०२५–२६ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आविष्कार अभियान या उपक्रमाअंतर्गत राज्यांतर्गत अभ्यासभेटीसाठी भूम तालुक्यातून निवड करण्यात आली आहे. ही शासकीय सहल दिनांक ११ मार्च … Read more

बदनामीच्या भीतीने तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

चंदननगर पोलिसांनी रुमपार्टनर तिघा तरुणींवर आत्महत्येस प्रवृत केल्याचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रुममधील तरुणी मानसिक त्रास देऊन बदनामीची धमकी देत असल्याची सुसाईट नोट लिहून एका तरुणीने गळफास आत्महत्या केली. चंदननगर पोलिसांनी तिच्या तीन रुममेट तरुणींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पायल किशोर राजगुरु (वय १९, रा. अरिहंत कॉम्प्लेक्स, महावीर सोसायटी, … Read more

ग्रामीण पत्रकार संघाकडून आदित्य कानडे यांचा विठ्ठलाच्या मूर्तीने सत्कार

सीए परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाल्याबद्दल ईट येथे गुणगौरव सोहळा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : ग्रामीण पत्रकार संघ, ईट यांच्या वतीने येथील विद्यार्थी आदित्य कानडे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ही प्रतिष्ठित परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केल्याबद्दल त्यांचा भव्य गुणगौरव सत्कार सोहळा मंगळवारी (दि. १०) सायंकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे … Read more

रिक्षा चोरुन त्यांना स्क्रॅप रिक्षांची नंबर प्लेट लावून वापरणारा चोरटा जेरबंद

१०२ सीसीटीव्ही फुटेज तपासून काळेपडळ पोलिसांच्या हाती लागला चोरटा : ६ रिक्षा केल्या जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिक्षा चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना काळेपडळ पोलिसांनी १०२ सीसीटीव्ही फुटेज तपासून रिक्षा चोरट्याला पकडले. त्याच्याकडील चौकशीत त्याने रिक्षा चोरी करुन स्क्रॅप रिक्षांचे नंबर लावून त्या वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी ६ रिक्षा जप्त केल्या आहेत. शादाब … Read more