आवृत्ती पुणे

प्रवाशाच्या पत्नीकडून पैसे मागवून लुबाडणारे चौघे जेरबंद

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : वाढदिवस साजरा करण्यासाठी उकळली होती खंडणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : स्वारगेटहून पुणे स्टेशनला घेऊन जाताना शेअर रिक्षातील चौघांनी प्रवाशाला मारहाण करून पत्नीकडून २५ हजार रुपये मागवून लुटणाऱ्या चौघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. गणेश आण्णा जगधने (वय २९, रा. डायस प्लॉट कॅनॉल, गुलटेकडी), अमोल उत्तम गायकवाड (वय ३२, रा. डायस … Read more

सायबर चोरट्यांच्या पुण्यातील दोघा साथीदारांना अटक

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकांची पावणे अकरा कोटींची फसवणूक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : डिजिटल अरेस्टची भीती दाखवून शहरातील एका ज्येष्ठ नागरिकाची पावणे अकरा कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. हर्षद सुभाष धनतोले (वय २३) आणि समर्थ सुरेश देशमुख (वय २४, दोघे सध्या रा. कर्वेनगर, मूळ रा. छत्रपती संभाजीनगर) … Read more

बार्शी शहरात धार्मिक स्थळांवरील अनधिकृत ध्वनीप्रक्षेपकांवर कारवाई

२८ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान ४० भोंगे जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीत दि. २८ फेब्रुवारी २०२६ ते दि. १ मार्च २०२६ या कालावधीत धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात आली. ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवणे, मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करणे तसेच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे … Read more

हुंडासाठी छळातून नवविवाहितेची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

बाणेरमधील घटना : बाणेर पोलिसांनी आय.टी इंजिनिअर पतीसह कुटुंबावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी वैष्णवी हगवणे हिच्या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. त्याचीच पुनरावृत्ती बाणेरमध्ये घडली आहे. परदेशात उच्चशिक्षित आयटी इंजिनिअर जावई मिळत असल्याचे वाटल्याने कलबुर्गी येथील एका प्राध्यापकाने आपली जमीन विकून मुलीचे थाटामाटात … Read more

एकाचवेळी शहरातून ९ गुंड तडीपार

पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांची बिबवेवाडी, आंबेगाव, मार्केटयार्डमधील गुंडांवर कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड या तीन पोलीस ठाण्यांच्या परिसरात दहशत माजविणाऱ्या ९ गुंडांना पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी २ वर्षांसाठी शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार केले आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरातील जालिंदर मसा मोरे (वय ४८, रा. अप्पर इंदिरानगर), अण्णा … Read more

पीएमपीचे बनावट मोबाईल अ‍ॅप्लीकेशनने केली फसवणूक

बनावट दैनंदिन पास बनवुन करत होता पीएमपीमधून प्रवास : तरुणावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करण्यासाठी किती पैसे लागतात? अगदी दिवसभराचा पास ७० रुपयांना मिळतो. असे असताना पीएमपीच्या मूळ अ‍ॅप्लिकेशनसारखेच दिसणारे बनावट मोबाईल अ‍ॅप्लिकेशन तयार करून त्यावर खोटा दैनंदिन पास तयार केला आणि त्याचा वापर करून पीएमपीची फसवणूक करणाऱ्या एका … Read more

सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल, काडतूस जप्त

खंडणी विरोधी पथकाने आंबेगाव पठार येथे रात्रभर सापळा रचून गुन्हेगाराला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी रात्रभर सापळा रचून सराईत गुन्हेगाराला पकडले व त्याच्याकडून गावठी पिस्टल आणि जिवंत काडतूस जप्त केले आहे. संकेत गोरख चोरघे (वय २३, रा. साई सिद्धी अपार्टमेंट, आंबेगाव पठार; मूळ रा. कोलवडी, ता. वेल्हा) … Read more

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात घातपातासह गुन्हेगारी कृत्य आहे का?

या दिशेने तपास सुरू : सी.आय.डी प्रमुख सुनील रामानंद यांचे निवेदन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात तीन प्रमुख मुद्द्यांच्या दिशेने सीआयडी तपास करत आहे. या अपघातात घातपात आहे का, रॅश नेग्लिजन्स (बेफिकीरपणा) आहे का आणि गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, … Read more