आवृत्ती पुणे

‘एचएमपीव्ही’ विषाणूबाबत घाबरून जाऊ नका, सतर्क राहा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे नागरिकांना आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ‘एचएमपीव्ही’ विषाणू नवीन नसून तो २००१ पासून ज्ञात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ८) ‘एचएमपीव्ही’ विषाणूविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी … Read more

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

सुमारे ४ हजार २८५ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे आणि परिसरासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या नियोजित आंतरराष्ट्रीय पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे विमानतळ प्रकल्पाबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून आता या कामाला गती मिळणार आहे. सह्याद्री अतिथीगृहात फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यातील विमानतळांच्या प्रगतीचा … Read more

भाजपा कामगार मोर्चा धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रोहन जाधव यांची निवड

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रोहन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बीड येथे भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस जोतिबा नन्नवरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या वेळी धाराशिव भाजपा जिल्हा चिटणीस अंगद मुरूमकर, वाशी तालुका अध्यक्ष राजगुरू कुकडे, कामगार मोर्चा प्रदेश सदस्य सचिन बारगजे, माजी … Read more

जैन स्थानकांवरील कर माफ करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे यांना भारतातील सर्व जैन स्थानकांवरील कर कायमस्वरूपी माफ करण्यासाठी निवेदन देण्यात आले. श्रीरंग बारणे यांनी निवेदनाची दखल घेत या विषयावर पुढील पावले उचलण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी देवेंद्र पारख, राजेंद्र दुगड उपस्थित होते.

टेंभुर्णी-लातूर रस्ता चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी मंजूर

बार्शीतील प्रवाशांना दिलासा, खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : टेंभुर्णी-लातूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ५७४ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली. हा महामार्ग सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी, कुडूवाडी, बार्शी, पांगरी तसेच धाराशिव जिल्ह्यातील येडशी, तडवळा, ढोकी आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारा आहे. बार्शी … Read more