आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 11, 2022
Spread the love

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : खुडे ब्रिजजवळ रिक्षाची वाट पाहताना लुबाडले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षाचालकांसह चौघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर येथील खुडे ब्रिज येथे रिक्षाची वाट पाहत असताना ६ मार्च २०२२ रोजी पहाटे ही घटना घडली.

गणेश पाठक (वय ३५, रा. पुनावळे, पुणे) यांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी शिवाजीनगर येथील खुडे ब्रिजच्या खाली रिक्षाची वाट पाहत थांबला होता. त्यावेळी एका रिक्षाचालकाने डेक्कन सोडतो असे सांगितले, त्याचवेळी त्यांच्यासोबतच्या तीन अनोळखींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूच्या धाकाने खिशातील सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि रोख पाचशे रुपये चोरून नेले. शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके पुढील तपास करीत आहेत.

get_footer();