आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चंदननगरच्या हवालदाराने केली रात्री उशिरा तोडपाणी!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 13, 2022
Spread the love

महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून दोन हजाराची लाच घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

अनिल निवृत्ती होळकर (असे लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराचे नाव आहे. होळकर हे सध्या चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत.

पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार यांनी एका महिलेला 50 हजार रूपये उसने दिले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची कोणतीही तक्रार न घेण्यासाठी पोलिस हवालदार होळकर यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 हजार रूपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार होळकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष होळकर यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुरज गुरव, अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक विजयमाला पवार, पोलिस हवालदार अंकुश माने, अशफाक इनामदार, पोलिस अंमलदार शिल्पा तुपे, रियाज शेख, चालक दिपक दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();