आवृत्ती पुणे
← Back to Homepage

” दृष्टिकोन बदला -विचार बदला व संधीचे सोने करा – राजेश पांडे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 21, 2022
Spread the love

प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून शाळेमध्ये “अटल टिंकरिंग लॅब व डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम ” प्रयोग शाळा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : महर्षिनगर येथील श्री संत नामदेव प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मध्ये नगरसेवक प्रवीण चोरबेले यांच्या प्रयत्नातून शाळे मध्ये “अटल टिंकरिंग लॅब व डॉ. ए. पी जे अब्दुल कलाम ” प्रयोग शाळा व ” S.K.F ” तर्फे विज्ञान गणिताची प्रयोगशाळा व पु. ल. देशपांडे ग्रंथालय असे विविध कामाचे उद्घाटन महात्मा फुले विद्यापीठ चे सदस्य व संघठन मंत्री राजेश पांडे, पुणे भा.ज.पा. चे उपाध्यक्ष श्रीपादजी ठेकणे सर,उपशिक्षण अधिकारी दामोधर उंडे सर व दिपक नागपुरे यांच्या हस्ते पार पडले.

या वेळी राजेशजी पांडे यांनी सांगितले कि म.न.पाच्या शाळेमध्ये शिकणार्‍या मुलांना प्रचंड सुविधा उपलब्ध करून दिले आहे. भारत सरकारची लॅब उपलब्ध होणे हि खुप मोठी गोष्ट आहे. या संधीचे सोने करण्याचे प्रयत्न करत मी आयुष्यात काही तरी करेल ” स्टार्टप इंडिया ” च्या माध्यमातून नरेंद्र मोदींचे स्वप्न आहे कि या भारतातील मुले प्रचंड उत्साही व बुद्धीमतावाले आहेत त्यांना संधी मिळत नाही. त्याला भारत सरकार मदत करायला तयार आहे. त्याला सर्व प्रकारचे सहकार्य करायला तयार आहे, फक्त तुमचा दृष्टिकोन बदला, विचार बदला हि संधी आहे आणि हि संधी तुम्हाला शाळेने उपलब्ध करून दिली आहे. त्याचा उपयोग करा मी काय करू शकतो याच्यातून तुमच्यातला अब्दुल कलाम तयार होईल तो निर्धार तुम्ही करा.

या प्रसंगी प्रविण चोरबेले यांनी प्रास्ताविक करताना सांगितले कि पुणे म.न.पाच्या शाळेमध्ये प्रथमच अशी लॅब झाली आहे. आणि हि लॅब मुलाचे आयुष्य घडविणार आहे व त्याच प्रमाणे विद्यार्थ्यांना वाचनाची आवड व्हावी म्हणून पु.ल. देशपांडे ग्रंथालयचे उपयोग होणार आहे. व त्याच प्रमाणे ए.पी. जे. अब्दुल कलाम सारखी प्रयोग शाळा म्हणजे एक आदर्श ठरणार आहे. असे मत या प्रसंगी व्यक्त केले.

get_footer();