आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चरस अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

साडेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : अहमदनगर येथून पुणे शहरात अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. आरोपींकडून 8 लाख 46 हजार रुपये किमतीचे दोन किलो 110 ग्रॅम वजनाचे चरस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पुणे शहरातील संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांब्यावर करण्यात आली.

इक्बाल शमीम खान (वय 24, सध्या रा. निगडी, पिंपरी चिंचवड, मूळ रा. राजनगर, नुर इमाम मशिदीशेजारी, अहमदनगर), फिरोज शरीफ खान (वय 33, रा. बारा इमाम कोटला, अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांना माहिती मिळाली की, संगमवाडी येथील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बस थांब्यावर दोन व्यक्ती थांबले असून त्यांच्याकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीची पाहणी केली असता त्यामध्ये चरस हा अंमली पदार्थ आढळून आला. हे दोघे शहरामध्ये अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आल्याचे तपासात निष्पन्न झाले. दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर, उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, हवालदार संतोष देशपांडे, बोमादंडी, चेतन गायकवाड, जाचक, साहिल शेख, जगदाळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

get_footer();