आवृत्ती पुणे
← Back to Homepage

चोरीची वाळू वाहतूक करणारे पोलिसांच्या ताब्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 1, 2021
Spread the love

पंढरपूर पोलिसांची कामगिरी : चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पंढरपूर : दोन ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक करणारी दोन वाहने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याकडून ताब्यात घेण्यात येऊन एकूण साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एकूण चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 31 ऑगस्ट) रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत भटुबरे अहिल्यादेवी चौक येथे पंढरपूर ते टेंभुर्णी जाणाऱ्या रोडवर दोन वेगवेगळ्या वाहनांतून एकूण अंदाजे दोन ब्रास वाळू चोरून घेऊन जात असताना मिळून आले.

त्यात एक पिकअप वाहनातून व एका टाटा कंपनीच्या एन्ट्रा मालवाहतूक वहनांतून प्रत्येकी अंदाजे एक-एक ब्रास वाळू आणि प्रत्येकी दोन इसम मिळून आले. दोन माल वाहतूक वाहने आणि त्यामधील वाळूसह एकूण 05,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करुन दोन्हीही वाहनांतील एकूण चार आरोपींविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे.


सदरची कामगिरी पोलीस सबइनेस्पॅक्टर अमित सिद-पाटील, पोलिस हवालदार राऊत, हरिदास पांढरे, पोलीस नाईक रवी माने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गायकवाड, पोलीस नाईक केशव पवार यांनी केली आहे.

get_footer();