आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहनचालकांनी चुकीच्या चलन बाबत ऑनलाइन करावी तक्रार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 12, 2022
Spread the love

पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचे आवाहन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाहनचालकांनी वाहतूक नियमभंगाच्या अनुषंगाने आलेल्या चुकीच्या चलनाबाबत तक्रार पोलीस उपायुक्त कार्यालयात येऊन न करता mahatrafficapp/ twitter app/ what’s app या ॲपद्वारे करावी, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे.

ई-चलान सिस्टीममधील चुकीमुळे वाहनचालकांना चुकीचे चलनाबाबत संदेश प्राप्त होतो. त्यानंतर वाहनचालक थेट पोलीस उपायुक्त कार्यालयामध्ये येऊन तक्रार दाखल करीत असून, त्यांचा वेळ वाया जातो. त्यामुळे चुकीच्या चलनाची गुगल प्लेस्टोअरवरून mahatrafficapp हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. या mahatrafficapp ॲप्लिकेशनमध्ये grievance या टॅबवर चुकीच्या चलनाबाबत ऑनलाइन तक्रार करता येते. तसेच वाहतूक शाखेच्या punetrafficpolice या ट्वीटर अकाउंटवर किंवा व्हॉट्सॲप क्र.८४११८००१०० वर नागरिक आपली तक्रार नोंदवू शकतात. त्या तक्रारींचे वाहतूक शाखा कार्यालयामार्फत निरसन केले जाते, असे त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविले आहे.

get_footer();