आवृत्ती पुणे
← Back to Homepage

…न्यायालयात केली बनावट कागदपत्रे सादर

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 27, 2021
Spread the love

पती व सासर्‍यांवर गुन्हा दाखल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पोटगी द्यावी लागू नये, म्हणून पत्नी एका कंपनीत काम करीत असल्याची बनावट कागदपत्रे तयार करुन कौटुंबिक न्यायालयात सादर केल्याप्रकरणी पोलिसांनी पती व सासर्‍यांविरुद्ध न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अनंत रमेश पाबळे (वय ४०) आणि रमेश केशव पावळे (वय ७२, दोघे रा. टेल्को कॉलनी, निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हडपसर येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने फिर्याद दिली आहे. कौटुंबिक न्यायालयात त्यांचा पोटगीचा खटला सुरु आहे.

अनंत पाबळे यांनी या खटल्यात ८ नोव्हेंबर २०१९ रोजी काही एस्तऐवज सादर केले. त्यात फिर्यादी यांना पोटगी मिळू नये, म्हणून त्या एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करीत आहेत, असा खोटा दस्तऐवज बनवून तो शिवाजीनगरमधील कौटुंबिक न्यायालयात सादर केला. तो खरा आहे, असे न्यायालयास सांगून त्यांनी फिर्यादी व न्यायालयाची फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.


get_footer();