आवृत्ती पुणे
← Back to Homepage

कोयता व बॅटने जबर मारहाण करणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 18, 2021
Spread the love

येरवड्यातील घटना : प्रेमसंबंधाच्या नात्यातून घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमसंबंधाच्या नात्यातून कोयते व बॅटने जबर मारहाण करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. ही घटना येरवड्यातील शांतीनगरमधील दुर्गामाता मंदिराजवळ शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

सोन्या बनसोडे (वय ३२), अमोल कांबळे (वय ३५), रवी बनसोडे (वय ३६, सर्व रा. शांतीनगर, येरवडा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी अशोक कुचेकर (वय ३४, रा. शांतीनगर, येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या भावाचे बनसोडेंच्या मेव्हणीसोबत प्रेमसंबंधाचे नाते होते. त्यावरून फिर्यादीच्या भावास संगनमताने कोयते, बॅटने मारहाण करून जबर जखमी केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सातपुते करीत आहेत.

get_footer();