आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दहावीत शिकणाऱ्या मुलाची राहत्या घरात आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना : आत्महत्येचे कारण समजू शकले नाही

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दहावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर येथील काकडे सिटी येथे शुक्रवारी (दि.7) रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

आदी अमित कर्वे (वय-15 रा. काकडे सिटी, कर्वे रस्ता) असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.

वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी सांगितले की, आदी, त्याचे आई-वडील व बहिण असे चारजण काकडे सिटी परिसरात राहतात. आदीचे वडील एका खासगी बँकेत नोकरी करतात तर आई अभिनव शाळेत शिक्षिका आहे. मोठी बहिण महाविद्यालयात शिक्षण घेते तर आदी जवळच्या शाळेत 10 वी मध्ये शिकत होता.

शुक्रवारी घरातील सर्वजण आपापल्या कामाला निघून गेल्यानंतर आदी घरात एकटाच होता. सायंकाळी आदीची मोठी बहिण घरी आल्यानंतर तिला आदीने घरामध्ये गळफास घेतल्याचे दिसले. तिने तात्काळ याची माहिती आई-वडिलांना दिली. आदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. याबाबत वारजे माळवाडी पोलिसांना खबर देण्यात आली. आदीने आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

get_footer();