आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीची तब्बल 29 वर्षांनी मुक्तता

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 28, 2021
Spread the love

साक्षीदार ओळखू शकले नाहीत : जिल्हा आणि सत्र न्यायाधीश वेदपाठक यांनी दिला आदेश

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याच्या प्रकरणातील आरोपीची तब्बल 29 वर्षानंतर सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली आहे. साक्षीदार आरोपीला ओळखू शकले नाहीत. त्याच्याविरूध कोणताही थेट पुरावा नसून, कसलीही जप्ती झालेली नाही. त्यामुळे त्याला निर्दोष सोडण्याचा युक्तीवाद ॲड. सुहास सावता कोल्हे यांनी केला. त्यानुसार जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांनी हा आदेश दिला.

बबन पांडुरंग काळभोर असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. सुहास सावता कोल्हे, ॲड. विनोद काकडे आणि ॲड. अमोल काळे यांनी काम पाहिले. या प्रकरणात आठ जणांवर गुन्हा दाखल होता. त्यापैकी सहा जणांच्या सुनावणी दरम्यान मृत्यू झाला आहे.

एक आरोपी अद्याप फरार आहे. त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलेले आहे. 15 जुलै 1992 रोजी पुणे-सातारा रस्ता येथील कापुरहोळ गावच्या हद्दीतील पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला.

सातारा बाजूकडून जीपमधून येऊन तलावारीच्या धाकाने रोख 12 हजार 594 आणि गॅस आईलचे डब्बे मिळून एकुण 14 हजार 194 रुपये यामध्ये लांबविण्यात आले होते. याबाबत कॅशिअर कचरू रामप्रसाद बाहेती यांनी भोर पोलिसात फिर्याद दिली होती.

get_footer();