आवृत्ती पुणे
← Back to Homepage

प्रेमसंबंधाला नकार देत रस्त्यात विनयभंग करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 11, 2022
Spread the love

विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : कुमठेकर रस्त्यावरील चित्र शाळा सोसायटीसमोर घडला प्रकार

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : प्रेमसंबंधाला नकार देणाऱ्या तरुणीचा भररस्त्यात विनयभंग करणाऱ्याला पोलिसांनी जेरबंद केले. हा प्रकार शुक्रवारी (दि.8) सायंकाळी साडेचारच्या सुमारास कुमठेकर रोडवरील चित्र शाळा सोसायटीसमोर घडला आहे.

प्रज्वल संजय जाधव (वय 22, रा. नारायण पेठ, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात 21 वर्षाच्या तरुणीने तक्रार केली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रज्वल जाधव याने पीडित तरुणीकडे प्रेम संबंधाबाबत विचारणा केली होती. मात्र तरुणीने त्याला नकार दिला. प्रेम संबंधास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने तरुणीचा पाठलाग केला. तसेच फिर्यादी तरुणीला शिवीगाळ करुन ‘तुझे करिअर खराब करतो’ अशी धमकी दिली.
पीडित तरुणीने शनिवारी (दि.9) आरोपीविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी प्रज्वल जाधव याच्यावर गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

get_footer();