आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून मोबाईल चोरणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 25, 2022
Spread the love

विश्रांतवाडी पोलिसांत फिर्याद : विद्यानगरमध्ये घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डिपार्टमेंटची माणसे असल्याचे सांगून फोन करण्यासाठी मोबाईल घेत चोरून नेणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २३ मार्च २०२२ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास विश्रांतवाडीतील विद्यानगरमध्ये घडली.

विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने फिर्याद दिली असून, दोन अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विश्रांतवाडीतील विद्यानगरमध्ये जेवन झाल्यानंतर फेरफटका मारीत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आम्ही डिपार्टमेंटची माणसे आहोत, तुमचा मोबाईल फोन करण्यासाठी द्या, असे सांगून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून पळून गेले. विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक एल. आर. सातपुते पुढील तपास करीत आहेत.

get_footer();