आवृत्ती पुणे
← Back to Homepage

देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • May 5, 2022
Spread the love

लोणीकंद पोलिसांत फिर्याद : सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क

पुणे : घरी आलेल्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नराधमाने देवीचा प्रसाद म्हणून गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केला. या अत्याचारातून ही मुलगी गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेबर ते ऑक्टोबर 2021 मध्ये घडला होता.

या प्रकरणी या मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी व त्यांचे पती हे कामासाठी सकाळी घराबाहेर जातात. त्यांची अकरावीत शिकणारी मुलगी एकटीच घरात होती. यावेळी एक जण त्यांच्या घरी आला. मुलीला एकटी पाहून त्याने तिला देवीचा प्रसाद खायला दिला. प्रसाद खाल्यावर ही मुलगी बेशुद्ध पडली. त्यानंतर या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आता या मुलीमध्ये शारीरिक बदल दिसू लागले. तसेच तिला त्रास होऊ लागल्याने तपासणी केली असता ती 30 आठवड्याची गर्भवती असल्याचे आढळून आले. त्यानंतर तिच्याकडे चौकशी केल्यावर हा प्रकार समोर आला. तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

get_footer();