आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धक्का का मारला म्हणून विचारले असता लोखंडी चेनने केली मारहाण

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 8, 2021
Spread the love

विमाननगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सार्वजनिक रस्त्याने जात असताना धक्का का मारला विचारले म्हणून तिघांनी लोखंडीचेन व हाताने मारहाण केली. ही घटना विमाननगरमधील बजाज फिर्न्झरसमोरील सार्वजनिक रस्त्यावर ६ सप्टेंबर २०२१ रोजी घडली.

निल जैन (वय २४, रा. कोनार्क ए-प्लस, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओळखीच्या तिघांसह १४-१५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी विमाननगरमधील बजाज फिर्न्झरसमोरील सार्वजनिक रस्त्यावरून पार्सल घेऊन जात होते. त्यावेळी आरोपींनी फिर्यादीला धक्क मारला, म्हणून धक्का का मारला असे विचारले. त्यावेळी आरोपींनी तू ठीक से क्यू नही चलता असे म्हणत साथीदाराला बोलावून लोखंडी चेन, हाताने मारहाण केली. विनानतळ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एन. लहाने तपास करीत आहेत.

get_footer();