आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धनकवडीत दहशत माजवणाऱ्या कोयता गॅंगची काढली धिंड

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 8, 2022
Spread the love

पुणे पोलीस अँक्शन मोडमध्ये : आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : धनकवडी परिसरात कोयता आणि हत्यारे घेऊन दहशत माजविणाऱ्या 6 गुन्हेगारांना अटक करुन त्यांची सहकारनगर पोलिसांनी बालाजीनगरमधून धिंड काढली. आरोपींना 8 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

धनकवडी भागातील नागरिकांमधील भीती कमी व्हावी आणि परत गुन्हेगारांकडून अशा घटना घडू नये यासाठी पोलिसांनी आरोपींची त्याच भागातून वरात काढली आहे. पोलिसांनी सांगितले की, सोशल मीडियावर रविवारी (3 एप्रिल) रोजी गुंडांनी काही जणांना मारहाण केल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी संबधित आरोपींना चांगलाच दणका दिला आहे. पोलिसांनी आरोपींना अटक करून गुरुवारी त्यांची धनकवडी भागातील बालाजीनगर येथून धिंड काढली. यामधील आरोपींनी यापूर्वी अनेक गुन्हे केलेले आहेत.

दरम्यान, बालाजीनगर येथील रजनी कॉर्नर परिसरात धारदार हत्यार हातात घेऊन दहशत पसरवली जात आहे. हातात कोयते घेऊन नागरिकांवर हल्ले केले जाताहेत. फुकट भाजी दिली नाही म्हणून मारहाण केली जात आहे, पाया पडायला लावलं जात आहे आणि या घटनांचे व्हिडीओ शूट करुन दहशत पसरवली जात आहे. अशा नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र, पुणे पोलीस कडक कारवाई करत नसल्याचा आरोपही नागरिकांमधून केला जात होता. यानंतर आता पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. थेट पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानंतर वरिष्ठ पोलिसांसह पोलीस पथकांनी आरोपींना चांगलाच दणका दिला आहे.

get_footer();