आवृत्ती पुणे
← Back to Homepage

धानोरीतील बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 2, 2022
Spread the love

सामाजिक सुरक्षा विभागाची कारवाई : चार हजारांची रोकड केली जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : धानोरी जकात नाक्याजवळ बेकायदेशीर जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार घटनास्थळी धाव घेत जुगार खेळत व खेळविणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली. यावेळी रोख चार हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

शंकर नरसिंग शावणे (वय ४२, रा. लोहगाव, पुणे), बबन बन्सी सरोदे (वय ५१, रा. विश्रांतवाडी, पुणे), धनंजय बापुराव गुट्टे (वय ३५, रा. धानोरी) यांनी आर्थिक फायद्यासाठी बेकायदेशीर कल्याण मटका चिठ्ठ्यावर घेत होते. त्यावेळी सूरज माणिकराव मुळे (वय ३६, रा. लोहगाव, पुणे), अमित सुखदेव शेलार (वय २५, रा. विश्रांतवाडी, पुणे), सनी राम तामचेकर (वय २७, रा. येरवडा, पुणे), संदीप अरुण भागवत (वय ४२, रा. धानोरी, पुणे), बबलू बाळू राठोड (वय २७, रा. येरवडा, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलीस उपनिरीक्षिका सुप्रिया पंढरकर, पोलीस अंमलदार बाबा कर्पे, मनिषा पुकाळे, अश्विनी केकाण, हणमंत कांबळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();