आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दीड कोटी रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने मूळ मालकांना दिले परत

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 26, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांची कामगिरी : अकरा गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकल्या

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मागिल पाच महिन्यात जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या ११ गुन्ह्यातील आरोपींना हडपसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून ६०० ग्रॅम सोने, ११०० ग्रॅम चांदी, दुचाकी व चारचाकी १०६ वाहने आणि ३८ मोबाईल असा एकूण दीड कोटी रुपयांहून अधिक किमतीचा माल मूळ मालकांना पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांच्या हस्ते देण्यात आला.

हडपसर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे, पोलीस अंमलदार जी. डी. इरकर, महिला पोलीस अंमलदार एस. एस. म्हांगरे यांच्या प्रयत्नामुळे फिर्यादींना त्यांचे दागिने परत करण्यास मदत झाली. फिर्यादींनी चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने परत मिळवून दिल्याबद्दल हडपसर पोलिसांची आभार मानले.

जबरी चोरी, घरफोडी, चोरीच्या ११ गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून २९४ ग्रॅम ५१४ मिली व १०६६ ग्रॅम ३४० मिली चांदी असा एकूण ११ लाख ७६ हजार ५७६ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने मूळमालकांना परत दिले. तसेच, १०६ वाहनांव्यतिरिक्त बेवारस स्थितीतील २४९ बिनधनी दुचाकीपैकी ११६ दुचाकी वाहनमालकांचा नाव व पत्ता शोधून ५८ लाख रुपयांची वाहने परत देण्यात येणार आहेत.

get_footer();