आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दीड वर्षाची चिमुकली पालकांच्या स्वाधीन

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 22, 2021
Spread the love

ताडीवाला रोड पोलिसांची कामगिरी : पालकांना दक्षतेचे आवाहन

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सापडलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला पालकांच्या स्वाधीन करण्यात ताडीवाला रोड पोलिसांना यश मिळाले असून, पालकांना आपल्या पाल्याकडे निक्षून लक्ष देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून रिक्षामध्ये हरवलेल्या दीड वर्षाच्या मुलीच्या पालकांचा शोध घेऊन त्यांच्या ताब्यात सुखरूप दिले. पालकांनी लहान मुलांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हरवलेली मुले घाबरलेली असतात, त्यांना बोलता येत नाही, अशा वेळी त्यांच्या पालकांचा शोध घेणे कठीण असते. मात्र, पोलीस तशाही परिस्थितीमध्ये उत्तम कामगिरी करीत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

गुरुवारी (२१ ऑक्टोबर ) सायंकाळी पाचच्या सुमारास नंदादीप हॉटेल, ताडीवाला रोड येथील रिक्षामध्ये दीड वर्षाची मुलगी असल्याची माहिती विनोद कांबळे (पंचशील चौक) यांनी ताडीवाला रोड पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांना दिली. गोरड यांनी तात्काळ मुलीचा फोटो आणि माहिती सोशल मीडियावर शेअर करीत पालकांचा शोध सुरू केला. दरम्यान, मुलीचे वडील आसिफ नने खान (वय ३०, रा. प्रायव्हेट रोड, १३ ताडीवाला रोड, पुणे) असल्याचे समजले. त्यांनी तातडीने पोलिसांच्या दोन टीम तयार करून आसिफ खान यांचा शोध घेतला. मुलगी त्यांचीच असल्याची खात्री करून मुलीची आई नजमा व वडिल आसिफ खान यांच्या ताब्यात दिले. यावेळी खान कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले.

मुलीच्या आई-वडिलांचा शोध घेण्याची उत्तम कामगिरी, पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड, पोलीस हवालदार मोमीन, पोलीस नाईक काळे, पोलीस अंमलदार प्रकाश सावंत, बालाजी मगर, राजेंद्र शिंदे यांच्या पथकाने केली.


get_footer();