आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दिव्यांग मुलांची विशेष कामगिरी कौतुकास्पद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 9, 2022
Spread the love

डॉ. रविंद्र शिसवे : पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंगमधील यशस्वी खेळाडूंचा सत्कार

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : आपण कुठेही कमी नाही, हीच बाब या दिव्यांग मुलांनी पॅरालिंपिंग नॅशनल स्वीमिंग चॅम्पियन स्पर्धेत उत्तुंग यश मिळवून दाखवून दिली आहे. त्यांचे कौतुक करताना विशेष अभिमान वाटत आहे, असे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

उदयपूर (राजस्थान) येथे 21 व्या पॅरालिंपिक नॅशनल स्वीमिंग चॅम्पियन स्पर्धेमध्ये दिव्यांग मुलांनी उत्तुंग यश मिळविले. त्यांचा पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये पोलीस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी रुत्विक जोशी याने दोन ब्राँझ पदके, गौरी गाडगीळ हिने एक गोल्ड व एक ब्राँझ आणि देवांशू रेवतकर हिने एक ब्राँझ पदक मिळविले यांचे विशेष कौतुक करण्यात आले. याप्रसंगी पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, मुकेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र पवार, सौरभ देशपांडे, अनंत शिंदे, तसेच कर्मा फाऊंडेशनच्या प्रिया मकारिया व मुलांचे पालक उपस्थित होते.

get_footer();