आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या सराईताला केली अटक

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • February 3, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कामगिरी : परिसरात कोयता घेऊन पसरवित होता दहशत

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तडीपार केलेल्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. कवडीपाट परिसरात आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील कोयता जप्त केला.

राज रवींद्र पवार (वय २३, रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, दोन वर्षांकरिता तडीपार केलेला सराईत कवडीपाट परिसरात दहशत पसरवित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कवडीपाट परिसरात तपास घेऊन त्याला अटक करून त्याच्याकडील कोयता जप्त केला.

लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर, अंमलदार पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक अमित साळुंके, पोलीस शिपाई राजेश दराडे, बाजीराव वीर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();