आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डॉक्टरांना धमकावून खंडणी घेणारा मंगेश कांचन जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • April 14, 2022
Spread the love

लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : खंडणी घेताना रंगेहाथ राहत्या घरात पकडले

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : दोन डॉक्टरांना धमकावून तीस लाख रुपयांची खंडणी उकळणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या. त्याच्या राहत्या घरात खंडणी घेताना मंगळवारी (दि.12) उरुळी कांचन येथे लोणी काळभोर पोलिसांनी कारवाई केली.

मंगेश माणिक कांचन (वय – 35 रा. पाढरस्थळ, उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने तक्रारदार व त्यांचे डॉक्टर मित्र हे मिळून गर्भलिंग निदान व गर्भपात करतात असे खोटे साक्षीदार उभे करुन त्याबाबत माझ्याकडे व्हीडिओ क्लिप असून, ती मी पोलिसांकडे देऊन तुम्हाला गुन्ह्यात अडकवतो अशी धमकी दिली. तसेच त्यांच्याकडे 30 लाख रुपयाची खंडणी मागितली. याबाबत तक्रारदार यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार केली. तसेच फिर्यादी यांना आरोपी व त्याच्या साथिदाराने बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणीची रक्कम घेऊन घरी बोलावले असल्याचे पोलिसांना सांगितले.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी कारवाईचे नियोजन करुन सापळा रचला. तक्रारदार हे आरोपीच्या राहत्या घरी जाऊन खंडणीची रक्कम देताच पोलिसांनी आरोपी मंगेश कांचन याला रंगेहात पकडले. आरोपीकडून खंडणीची रक्कम जप्त करुन त्याला अटक केली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी यवत, दौड, लोणीकंद, ओतूर, विमानतळ, हिंजवडी पोलीस ठाण्यात खुन, खंडणी, दरोड्याचा प्रयत्न, जबरी चोरी, अपहरण, बलात्कार असे 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे करीत आहेत.

get_footer();