आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिसांनी प्रतिमा उंचावण्यासाठी नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 11, 2021
Spread the love

डॉ. बबन जोगदंड : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये पोलीसांसाठी व्याख्यानाचे आयोजन

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

भविष्यातील पोलीस प्रशासन तंत्रज्ञानावर आधारित असल्याने हे तंत्रज्ञान अवगत करण्याची गरज आहे. पोलिसांनी आपली प्रतिमा उंचावण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवून वेगळेपण सिद्ध करावे, असे आवाहन यशदा पुणे येथील माध्यम व प्रकाशन केंद्राचे प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी केले.

लष्कर पोलीस ठाण्यात पोलिसांसाठी दर गुरुवारी एका मान्यवर व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याचा उपक्रम पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अशोक कदम यांनी सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत आज ७ व्या व्याख्यानाचे पुष्प डॉ. जोगदंड यांच्या हस्ते गुंफण्यात आले.

डॉ. जोगदंड म्हणाले की, भविष्यामध्ये सर्वच क्षेत्रात मोठे प्रचंड बदल होणार आहेत. पुढे जगामध्ये माहितीचा स्फोट होऊ पाहात आहे. त्याचा अनेक क्षेत्रावर परिणाम होईल. पोलिसांना संवाद कौशल्य, इंग्रजी भाषेचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, आत्मविश्वास आणि मेहनत ही पंचसूत्री सांगितली. पोलिसांनी सामान्य लोकांसाठी काम करताना आपल्या कामातून आपले वेगळेपण सिद्ध करावे. त्याचबरोबर आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवावी. नवीन गोष्टी शिकण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्पर्धेचे युग नसून सादरीकरणाचे आहे, त्यामुळे आपले सादरीकरण व व्यवस्थापन कौशल्य उत्तम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.

प्रारंभी पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी प्रास्ताविकामध्ये व्याख्यानामागची भूमिका विशद केली. अधिकारी-कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनची तंत्रज्ञानात उत्कृष्ट कामगिरी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले.



get_footer();