आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डॉ. चव्हाण यांचा डुग्गू सापडल्याच्या आनंदावर विरजण!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 20, 2022
Spread the love

पुणे-नगर रस्त्यावर अपघात : ‘स्वर्णव’ला नांदेडवरून भेटायला येणाऱ्या आत्याचा अपघाती मृत्यू

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बाणेर येथील अपहरण झालेल्या स्वर्णव उर्फ डुग्गू सतीश चव्हाण हा सुखरुप घरी पोहचल्याची आनंदाची बातमी मिळाल्यानंतर त्याला भेटायला नांदेडवरुन निघालेल्या आत्याच्या गाडीला अपघात झाला असून त्यात आत्याचा मृत्यू झाला. त्यांची दोन मुले व पती जखमी झाले आहेत. नगर-पुणे रोडवर पहाटे हा अपघात झाला.

सुनीता संतोष राठोड-चव्हाण (वय ३६) असे मृत्यु पावलेल्या आत्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, समर राठोड (वय १४) आणि अमन राठोड (वय ६) अशी जखमी मुलांची नावे आहेत. ११ जानेवारी रोजी अपहरण झालेल्या स्वर्णव चव्हाण याची काल सुखरुप सुटका झाली. या आनंदात चव्हाण कुटुंबीय असताना त्यांच्यावर हा घाला घातला गेला आहे. सुनीता चव्हाण राठोड या त्यांचे पती व दोन मुलासह नांदेडहून पुण्याला येत होते. त्यांच्या कारचा पहाटे अपघात झाला. त्यात सुनीता राठोड चव्हाण यांचा मृत्यु झाला असून दोन मुलांवर बाणेर येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

get_footer();