आवृत्ती पुणे
← Back to Homepage

ड्रग्ज विक्रीसाठी आलेले दोन नायजेरियन जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 23, 2022
Spread the love

लष्कर पोलिसांची कामगिरी : १५ लाख २९हजारांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या दोन नायजेरियनांना कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट येथे लष्कर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १५ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, चिकवू रेऊबेन (वय ३६, रा. नालासोपारा, जि. ठाणे, मूळ- मकुरडी, नायजेरिया) आणि मोहम्मद मुसावी (वय ३८, रा. न्यू नाना पेठ, पदमजी पार्क, पुणे) असे अटक केलेल्या दोन नायजेरियनची नावे आहेत.

लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम व पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे रात्रगस्त करत होते. त्यावेळी कॅम्पमधील सिनेगॉग स्ट्रीट रस्त्यावरील पदपथावर थांबलेल्या दोघांना हटकताच पळून जाऊ लागले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे २३ ग्रॅम कोकेन, दोन चारचाकी वाहने, पासपोर्ट व दोन मोबाईल असा एकूण १५ लाख २९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आला.

अधिक तपासात चिकवू जेकवू रेऊबेन हा पुण्यात ड्रग्ज विक्रीकरिता आल्याचे उघडकीस आले. लष्कर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड पुढील तपास करीत आहेत. अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, सहायक पोलीस फौजदार शिर्के, पोलीस हवालदार मनसुब शेख, हिंदुराव शिंदे, कैलास चव्हाण, पोलीस नाईक तेजस जगदाळे, महिला पोलीस नाईक विजया वेदपाठक, मनिषा तळेकर, सलमान शेख, सागर हुदाळे, नानासाहेब घाडगे, आबासाहेब धावडे, नरळे, पवन भोसले, चक्रधर शिरगिरे, संभाजी दराडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();