आवृत्ती पुणे
← Back to Homepage

डी एस कुलकर्णी यांच्या सील केलेल्या बंगल्यात चोरी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 13, 2021
Spread the love

चोरट्यांनी सात लाखांचा ऐवज केला लंपास : चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सेनापती बापट रस्त्यावरील डीएसके यांचा सील केलेल्या बंगल्यातून सात लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाग्यश्री अमित कुलकर्णी (वय ३७) यांनी चतुश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑक्टोबर २०१९ ते ऑक्टोबर २०२१ दरम्यान ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, सेनापती बापट रस्त्यावर डीएसके यांचा सप्तशृंगी नावाचा बंगला आहे. डीएसके यांच्यावर ठेवीदारांचे पैसे न दिल्याच्या आरोपावरून डीएसके यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर ईडीने डीएसके यांचा हा बंगला सील केला होता. तेव्हापासून हा बंगला बंद आहे. तक्रारदार यांना या बंगल्यात चोरी झाल्याचा संशय आला होता. त्यामुळे त्यांनी अधिकारी पोलिस आणि पंचांसमक्ष जाऊन बंगल्याची पाहणी केली. त्यावेळी बंगल्यातून टीव्ही, कॉम्प्युटर, कॅमेरा, एलईडी, गिझर, पिठाची गिरणी, देवघरातील चांदीच्या वस्तू असा सहा लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चतु:श्रुंगी पोलिस अधिक तपास करत आहेत.

get_footer();