आवृत्ती पुणे
← Back to Homepage

दुचाकी चोर पोलीसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • August 27, 2021
Spread the love

युनीट १ ची कामगीरी : अप्पर पोलीस आयुक्तांनी केले कौतुक

महाराष्ट्र ३६० न्यूज

पुणे :सध्या पुणे शहरात दुचाकी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. हे थांबवण्यासाठी पुणे पोलिसांनी आता कंबर कसली आहे.विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या ह्द्दीमध्ये एक दुचाकी चोरी गेल्याची घटना २० जुलै रोजी घडली होती. युनीट १ चे पोलीस निरीक्षक शैलेश संखे यांनी याचा समांतर तपास सुरु केला.या तपासामध्ये त्यांनी आरोपीकडून १७ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. युनीट वन च्या पोलिसांनी केलेल्या या कामाचे कौतुक अप्पर पोलीस आयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी युनीट १ ला भेट देऊन केले.

या विषयी अधिक माहिती अशी की, सचिन तुकारामजी घुले वय ३० वर्ष रा.पानमळा दत्तवाडी पुणे यांनी आपली हिरो होंडा दुचाकी ही दिनांक २०/०७/२०२१ रोजी सकाळी ०९.१५ ते १२.३० वा. दरम्यान इंदुलाल कॉम्प्लेक्सच्या बाहेर, नवीपेठ पुणे येथे लॉक करुन पार्क करून ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्या बाबतची तक्रार त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे येथे केली होती. शैलेश संखे वरीष्ठ पोलीस निरीक्षक युनिट १ गुन्हे शाखा पुणे शहर, यांनी या संदर्भात गुन्ह्याचा समांतर तपास करून तसेच घटनास्थळावरील सी.सी.टि.व्ही कॅमेरे यांची पडताळणी करुन यातील गुन्हेगारा बाबत माहीती मिळवली. त्यानुसार युनिट-१ मधील अधिकारी व अमलदार यांनी घटनास्थळावरील सी.सी.टि.व्ही. कॅमेरा पडताळणी केली असता त्यामध्ये एक इसम मोटार सायकल घेवून जात असताना दिसून आला.

त्या इसमाची अधिक माहीती मिळवली असता सदर इसमाचे नाव समीर रांगावकर असे असल्याचे समजले. १८ ऑगस्ट रोजी पोलीस अमलदार शशीकांत दरेकर, दत्ता सोनावणे यांना त्यांच्या बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की आरोपी समीर रांगावकर हा नवी पेठ, निबांळकर वाडा या ठिकाणी येणार आहे. सापळा रचून त्यास शिताफीने मोटार सायकलसह ताब्यात घेतले.
त्याने प्रथम काही सांगण्यास नकार दिला. परंतु त्यास पोलीसी खाक्या दाखविताच त्याने पुणे शहर चिंचवड, पुणे ग्रामिण इ. ठिकाणावरुन मोटार सायकल्स चोरल्याचे कबुल करून चोरी केलेल्या मोटार विक्री करीता लपऊन ठेवलेल्या जागा दाखवून किमंत रुपये ३,८०,०००/- च्या एकूण १६ मोटारसायकला काढून दिल्या.यामुळे विविध पोलीस ठाण्यातील १५ गुन्ह्याची उकल झाली.युनीट वन च्या सर्व पोलिसांनी मिळून केलेल्या या कामाचे कौतुक अप्पर पोलीस आयुक्त श्रीनीवास घाडगे यांनी केले.


या तपासामध्ये वरीष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट १ शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक सुनिल कुलकर्णी, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार शशीकांत दरेकर, दत्ता सोनावणे, राहुल मखरे, सतीश भालेकर, अमोल पवार, विजयसिंह वसावे, अशोक माने, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, अजय थोरात, महेश बामगुडे, तुषार माळवदकर, अनिकेत बाबर मिना पिजंण व रुकसाना नदाफ यांनी कामगीरी केली.या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

get_footer();