आवृत्ती पुणे
← Back to Homepage

आयशर टेम्पोसह ७१ लाखांचा गुटखा जप्त

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • January 10, 2022
Spread the love

हडपसर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : सोलापूर रस्त्यावर हडपसर-पंधरा नंबर येथे ट्रक पकडला

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुणे सोलापूर महामार्गावर शनिवारी (दि. ८ डिसेंबर २०२२) मध्यरात्री गुटख्याने भरलेला आयशर कंटेनर पकडला. निपाणी, कर्नाटक येथून गुटखा पुण्याच्या दिशेने येत असल्याची माहिती रविवारी (दि. ९) पहाटे पाचच्या सुमारास मिळताच हडपसर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत कारवाई केली. ४८३ गुटख्याच्या बॅगसह ट्रक जप्त केला. ४६ लाख रुपयांचा गुटखा आणि २५ लाखांचा ट्रक असा मुद्देमाल जप्त केला. ट्रकमालक बिबवेवाडी येथील असून, त्याचा तपास सुरू आहे. ट्रकचालकाकडून सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी सांगितले.

आएशर टेम्पो वाहनचालक सामीउल्लाह मुर्जता हुसैन (वय ५१, रा. एस. एस. मार्ग, मुंबई, मूळ मुर्तजा ग्राम, मुडीलाकला, पोस्ट लोहरसन, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन अधिकारी गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सर्फराज शेख (रा. गोकुळनगर, अप्पर डेपो, बिबवेवाडी) आयशर टेम्पोमधून गुटखा घेऊन निप्पाणी व विजापूर येथून सोलापूर महामार्गाने फुरसुंगी येथे जात असल्याची माहिती उपनिरीक्षक अविनाश शिंदे यांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून पंधरानंबर, हडपसर येथे गुटख्याने भरलेला आयशर ट्रक ताब्यात घेतला.

आज दुपारी (ता. ९) अन्नसुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी पकडलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तपासणी केली. सुमारे साडेतीनशे गोणींमधून शेहचाळीस लाख रूपये किंमतीचा हिरा पानमसाला गुटखा त्यामध्ये आढळून आला आहे. सुमारे पंचवीस लाख रूपये किंमतीचा ट्रकही या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारात दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे म्हणाले की, बंगलोर मार्गावर तपासणी मोठ्या प्रमाणावर होते, त्यामुळे मालकाच्या आदेशावरून ट्रकचालक सोलापूर, टेंभुर्णीवरून नगर, नाशिक, खांदेकडे आणि पुण्याकडे नेला जातो. ट्रकमालक गुटखा आणून महाराष्ट्रात वितरीत करतो, ट्रकमालकासह चालकाचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

अपर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, हडपसर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वास डगळे, दिगंबर माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस शिपाई शाहिद शेख, प्रशांत टोणपे, पोलीस हवालदार विशाल गव्हाणे, राहुल मद्देल, पोलीस नाईक, शरद धांडे, हरिश्चंद्र खरात यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.

get_footer();