आवृत्ती पुणे
← Back to Homepage

फेसबुकवर 56 वर्षाच्या महिलेचे आक्षेपार्ह फोटो टाकून बदनामी

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • March 6, 2022
Spread the love

चंदननगर पोलिसांत गुन्हा : तिच्या दुसर्‍या पतीनं पाठविले जावयाला अश्लिल फोटो

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तरुण तरुणीच्या नावाने सोशल मीडियावर बनावट अकाऊंट काढून त्यांच्याविषयी बदनामीकारक मजकूर टाकणे, त्यांचे अश्लिल फोटो अपलोड करुन त्यांची बदनामी करण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. पण एका 56 वर्षाच्या महिलेचा बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन त्यावरुन अश्लिल मेसेज प्रसारित करुन तिचे बदनामीकारक फोटो अपलोड करण्याचा प्रकार समोर आला. हा प्रकार एक महिन्यांपूर्वी ते 2 मार्च दरम्यान घडला.

बनावट अकाऊंट तयार करणार्‍याबरोबरच तिचा पती बरुन भावेश करमाकर (रा. दार्जिलिंग, पश्चिम बंगाल) याच्यावर चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी खराडी येथे राहणार्‍या एका 56 वर्षाच्या महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपीने फिर्यादीचे बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले. त्या फेसबुक अकाऊंटवर त्याने फिर्यादीच्या नावाने मी घटस्फोटीता आहे. मला मसाज करणार्‍याची गरज असे, असे प्रकारचे अश्लिल मेसेज प्रसारित केले. सोबत फिर्यादीचा ईमेल आयडी प्रसारित केला. त्यामुळे फिर्यादी यांना वेगवेगळ्या लोकांचे ई – मेल येऊ लागले. त्याच्या जोडीने त्याने त्यांचे व त्यांच्या मुलीचे अश्लिल फोटो प्रसारित केले. तसेच त्यांच्या जावयाच्या मोबाईलवर हे फोटो पाठवून त्यांची बदनामी केली.

या महिलेने सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. सायबर पोलिसांनी तपास केल्यावर हे सर्व कृत्य चक्क तिच्या दुसर्‍या पतीने केलेले उघडकीस आले आहे. त्यात हे कृत्य त्यांचा दुसरा पती बरुन करमाकर याने केलेल्याचे उघड झाले. सध्या तो दार्जिलिंगला राहत आहे. पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तपास करीत आहेत.

get_footer();