आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महिलेचे ‘न्युड’ फोटो फेसबुकवर ‘व्हायरल’ करुन ‘बदनामी’

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • September 13, 2021
Spread the love

स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : गाझीयाबादच्या तरुणाने ब्लॅकमेल करून केलं ‘हे’ कृत्य

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

कोल्हापूर येथील एका महिलेबरोबर शरीरसंबंध ठेवुन त्याचे न्युड फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन उत्तर प्रदेशातील गाझीयाबादच्या एका तरुणाने महिलेवर वारंवार बलात्कार केला. त्यानंतर आता ते न्युड फोटो व व्हिडिओ फेसबुकवर टाकून महिलेची बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी कोल्हापूर येथील ५४ वर्षाच्या महिलेने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी संजीव वर्मा (वय ४८, रा. गाझीयाबाद, उत्तर प्रदेश) आणि मंजुला धरक (रा. हिमाचल प्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार स्वारगेट येथील हॉटेल टुलिप गार्डन व इतर वेगवेगळ्या यात्रादरम्यान वेगवेगळया ठिकाणी ३० डिसेंबर २०१७ ते ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला यांच्याशी आरोपी संजीव वर्मा याने ओळख वाढून त्यांना ३० डिसेंबर २०१७ रोजी हॉटेल टुलिप गार्डन येथे नेले. तेथे त्यांच्याबरोबर शरीर संबंध केले. यावेळी त्यांच्या नकळत या शरीर संबंधाचे न्युड फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर हे न्युड फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या चार वर्षात त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला.

काही दिवसांपूर्वी त्याने हे न्युड फोटो फिर्यादी यांचा मेव्हुणा यांच्या मोबाईलवर पाठविले. तसेच, फेसबुकवर फिर्यादी यांची बदनामी होईल असा मजकुर लिहून ते व्हायरल केले. त्यानंतर फिर्यादीने स्वारगेट पोलिसाकडे धाव घेतली असून पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.

get_footer();